Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Advertisements
उत्तर
- कवयित्री - नीरजा
- स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटणे.
-
या कवितेत स्त्री-पुरुष समानतेच्या आश्वासक भविष्याचे सार्वकालिक चित्र मांडले आहे. कवयित्रीने या कवितेत आशय मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी ‘मुक्तछंद’ वापरला आहे, ज्यामुळे कवितेतील वास्तव थेट हृदयाला भिडते. संपूर्ण कविता स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांची महत्त्वाची जाणीव करून देते. कवयित्रीची साधी आणि संवादात्मक भाषाशैली तिच्या विचारांना सहज आणि प्रभावीपणे मांडते. कवितेत आधुनिक स्त्रीचा स्वकर्तृत्वावरचा विश्वास, आव्हानांचा सामना करण्याची तिची तयारी आणि तिच्या असामान्य क्षमतांचे वर्णन आहे. त्याचबरोबर, स्त्रीच्या या क्षमतांचा आदर करून स्वतःची मानसिकता आणि वागणूक बदलणाऱ्या पुरुषाचे वर्णन भविष्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करते. संवादात्मक शैलीसह ‘भातुकली’, ‘चेंडू’ यांसारख्या समर्पक प्रतिमांचा वापर वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतो. यामुळेच ही कविता मला खूप आवडते.
संबंधित प्रश्न
कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ______
(आ) ______
चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी
खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

२) उत्तरे लिहा. (२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्यांच्या
मुलगा दाखवतो, तिला आपलं कसब पुन्हा एकदा
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
| ii. कसब - ______ |
