हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील आकृती मध्ये ΔABC या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत तर ΔFED हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृती मध्ये ΔABC या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत तर ΔFED हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा.

योग
Advertisements

उत्तर

पक्ष: ΔABC या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत.

साध्य: ΔFED हा समभुज त्रिकोण आहे.

सिद्धता:

ΔABC मध्ये,

बिंदू F आणि E हे अनुक्रमे बाजू AB आणि AC चे मध्यबिंदू आहेत.       ...(पक्ष)

∴ FE = `1/2` BC       ...(मध्यबिंदूचे प्रमेय)   ...(i)

ΔABC मध्ये,

बिंदू D आणि E हे अनुक्रमे बाजू BC आणि AC चे मध्यबिंदू आहेत.       ...(पक्ष)

∴ DE = `1/2` AB      ...(मध्यबिंदूचे प्रमेय)   ...(ii)

ΔABC मध्ये,

बिंदू D आणि F हे अनुक्रमे बाजू BC आणि AB चे मध्यबिंदू आहेत.       ...(पक्ष)

∴ DF = `1/2` AC       ...(मध्यबिंदूचे प्रमेय)   ...(iii)

आता, ΔABC हा समभुज त्रिकोण आहे.

∴ BC = AB = AC       ...(समभुज त्रिकोणाच्या बाजू)

∴ `1/2` BC = `1/2` AB = `1/2` AC     ...(दोन्ही बाजूंना `1 /2` ने गुणून)

∴ FE = DE = DF       ...[(i), (ii) व (iii) वरून]

∴ ΔFED हा समभुज त्रिकोण आहे.

shaalaa.com
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: चौकोन - सरावसंच 5.5 [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 चौकोन
सरावसंच 5.5 | Q 3. | पृष्ठ ७३

संबंधित प्रश्न

खालील आकृती मध्ये ΔABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. AB = 5 सेमी, AC = 9 सेमी व BC = 11 सेमी, तर XY, YZ, XZ ची लांबी काढा.


खालील आकृती मध्ये `square`PQRS आणि `square`MNRL हे आयत आहेत. बिंदू M हा PR चा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा.

  1. SL = LR
  2. LN = `1/2` SQ 


आकृती मध्ये रेख PD ही ΔPQR ची मध्यगा आहे. बिंदू T हा PD चा मध्यबिंदू आहे. QT वाढवल्यावर PR ला M बिंदूत छेदतो, तर दाखवा की `"PR"/"PM" = 1/3`.

[सूचना: DN || QM काढा.]


खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC आहे. P व Q हे अनुक्रमे रेख AD व रेख BC चे मध्यबिंदू आहेत, तर सिद्ध करा की, PQ || AB व PQ = `1/2 ("AB" + "DC")`


खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC. M आणि N हे अनुक्रमे कर्ण AC व कर्ण DB चे मध्यबिंदू आहेत. तर सिद्ध करा की, MN || AB.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×