हिंदी

गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. जोखमीचे निर्मूलन: भौतिक प्रमाणपत्रासंबंधीच्या सर्व जोखमीचे निर्मूलन होते जसे, विलंब, गहाळ होणे, चोरीस जाणे, खराब हाताळणी, इत्यादी.
  2. सुरक्षितता: भांडवल बाजारातील प्रतिभूती हाताळणी करण्याचा हा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. संपूर्ण पद्धती डिपॉझिटरी कायद्याअंतर्गत कार्य करते आणि सेबीद्‌वारे परीक्षण केले जाते. उदा. गुंतवणूकदार त्याचे खाते फ्रीज (Freeze) मोडमध्ये कुलूपबंद स्थितीत ठेवण्याची सूचना डिपॉझिटरी पार्टिसिपंटला देऊन प्रतिभूतींचे नावे किंवा/आणि जमा होणे टाळू शकतो.
  3. सोपे भाग हस्तांतरण:
    1. हस्तांतरण अर्ज भरणे व सादर करणे आवश्यक नसते.
    2. तसेच भौतिक स्वरूपात भाग हस्तांतरणावर असलेले मुद्रांक शुल्क लागू नाही.
    3. प्रतिभूतीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा कालावधी कमी केला जातो आणि प्रतिभूती व रोख रक्‍कम अनावश्यकपणे अधिक काळ गुंतून राहत नाही.
  4. खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना: गुंतवणूकदारास डी.पी.द्‌वारे तसेच डिपॉझिटरीद्‌वारे धारण केलेल्या प्रतिभूतींची आणि व्यवहाराच्या स्थितीची माहिती दिली जाते.
  5. कर्जास तारण: डिमॅट प्रतिभूती बँक आणि वित्तीय संस्था कर्जासाठी तारण म्हणून अग्रक्रमाने स्वीकारतात आणि व्याज आकारणीचा दर देखील कमी असतो.
  6. संच खरेदीची आवश्यकता नाही: सम आणि व्यस्तसंच (lots) स्वरूपात भागधारण करण्याची पद्धती नष्ट करते.
  7. नामनिर्देशन सुविधा: वैयक्तिक गुंतवणूकदार नामनिर्देशन सुविधेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे गुंतणूकदाराचा मृत्यू झाल्यास वारस नोंद प्रक्रिया सुलभ होते.
  8. स्वचलित जमा नावे: प्रतिभूतीवर परिणाम करणाऱ्या कंपनीने केलेल्या बदलाच्या कृतीच्या बाबतीत गुंतवणूकदाराचे खाते आपोआप जमा नावे केले जाते. यालाच ‘व्यवसायिक कृती’ (Corporate action) म्हणतात. कॉर्पोरेट ॲक्शनची काही उदाहरणे: लाभांश वाटप, बोनस भाग वाटप, हक्कभाग वाटप, मुदती पूर्वीच कर्जरोख्याची परतफेड, विलीनीकरण आणि अधिग्रहण, इत्यादी.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×