हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यात होते: (१) प्रतिलेखन (२) भाषांतरण (३) स्थानांतरण. प्रथिनांची निर्मिती DNA वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि RNA च्या माध्यमातून होते. यालाच प्रथिने निर्मिती सेंट्रल डॉग्मा असे म्हटले आहे.

  1. प्रतिलेखन: 
    या प्रक्रियेत DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार m-RNA तयार होतो. यासाठी DNA चे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्युक्लिओटाइडच्या क्रमवार रचनेनुसार m-RNA वर न्युक्लिओटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNA तील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो. प्रतिलेखन पेशीकेंद्रकात होते. मात्र DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला m-RNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश 'ट्रिप्लेट कोडॉन'च्या स्वरूपात असतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत तीन न्युक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो.
  2. भाषांतरण: 
    प्रत्येक m-RNA मध्ये हजारो कोडॉन असतात. ठरावीक कोडॉन ठरावीकच अमिनो आम्लांचीच ओळख पटवतात. ही योग्य ती अमिनो आम्ले पुरवण्याचे काम t-RNA करतो. त्याकरिता m-RNA वर जसा कोडॉन असतो, तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन t- RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात.
  3. स्थानांतरण:
    t-RNA चे कार्य पुढीलप्रमाणे असते t-RNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम, m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक-एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात, प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात.
shaalaa.com
प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 7. आ. | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×