Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा:
शहरीकरण आणि औद्योगिकीकरण
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| औद्योगिकीकरण | शहरीकरण |
| 1. औद्योगिकीकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यांमधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकीकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्येहोते. | 1. शहरीकरणाची प्रक्रिया दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषिजीवनाशी निगडित असणाऱ्या व्यवसायांमधून अर्थाजनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवाक्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रां मध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरितांचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धाप्रणाली, मूल्ये आणि वर्तनपद्धती यांमध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूस असतो. |
| 2. औद्योगिकीकरण हे प्रामुख्याने कारखाने आणि उद्योगांच्या वाढीशी संबंधित आहे. | 2. शहरीकरण हे प्रामुख्याने ग्रामीण आणि आदिवासी भागांतून औद्योगिक क्षेत्रांकडे होणाऱ्या स्थलांतराशी संबंधित असते. |
| 3. औद्योगिकीकरणामुळे भारतीय समाजात सामाजिक बदल घडून आला आहे. | 3. शहरीकरणाचे परिणाम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत दिसून येतात. स्थलांतरामुळे शहरी भागांचा आकार आणि गुंतागुंत वाढत आहे. |
| 4. औद्योगिकीकरण हे अवजड यंत्रसामग्रीचा वापर (यांत्रिकीकरण) आणि स्वयंचलनाचा परिणाम होते. | 4. आधुनिक शहरीकरण हे औद्योगिकीकरणाचा परिणाम होते. रोजगाराच्या शोधात लोक नागरी भागांकडे स्थलांतरित झाले. |
| 5. औद्योगिकीकरणामुळे संयुक्त कुटुंबांचे विघटन होण्यास आणि कुटुंबांचा आकार लहान होण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लागला. | 5. शहरीकरणामुळे गर्दीतही एकाकी असल्याची धारणा निर्माण झाली आहे. |
| 6. औद्योगिकीकरण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे श्रमविभागणी. | 6. शहरीकरणाचा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही समुदायांवर परिणाम होतो. स्थलांतरामुळे शहरी क्षेत्रांचा आकार आणि गुंतागुंत वाढत आहे. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
