Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
भारतातील पहिले आगळेवेगळे ‘पुस्तकांचे गाव’ महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही ‘वाचन-आनंद’ घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. |
प्रश्न:
- पुस्तकाच्या गावाचे नाव सांगा. (1)
- महाराष्ट्र शासनाचे कोणता प्रकल्प राबविला आहे? (1)
- पुस्तकांच्या गावाविषयी आपले मत मांडा. (2)
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
- भिलार हे पुस्तकांचे गाव आहे.
- महाराष्ट्र शासनाने ‘वाचन संस्कृती चळवळ’ ही योजना सुरू केली.
- माझ्या मते, ‘पुस्तकांचे गाव’ ही एक अत्यंत चांगली आणि आगळीवेगळी संकल्पना आहे. यामुळे लोकांना अधिक वाचन करण्यास प्रोत्साहन मिळते आणि पर्यटकांना मराठी साहित्याचा आस्वाद घेण्यास मदत होते. तसेच, यामुळे या गावाला एक विशेष ओळख प्राप्त होते आणि ज्ञानाचा प्रसार होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
