Advertisements
Advertisements
प्रश्न
भागपेढीपद्धतीचा घटक म्हणून डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डी.पी.) स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे. डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. ही अशी संस्था आहे जी गुंतवणुकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते.
प्रथम डिपॉझिटरीची स्थापना १९४७ मध्ये जर्मनी येथे झाली. भारतात डिपॉझिटरी कायदा १९९६ मध्ये संमत करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे व १९९१ पासूनच्या आर्थिक क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतीय भांडवल बाजार बराच वाढला आहे. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रणालींमध्ये सुधारणा करून अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज होती. भारतात प्रतिस्पर्धी बहु डिपॉझिटरी पद्धतीचा स्वीकार केला आहे.
भागपेढी पद्धती खालील घटकाच्या मदतीने कार्यान्वित होते.

- ही डिपॉझिटरीची प्रतिनिधी असते.
- सेबी कायद्यान्वये डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही नोंदणीकृत असते. सेबी अधिनियम (डिपॉझिटरी ॲन्ड पार्टिसिपंट) १९९६ अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त असतात.
- डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून डी. पी. काम करते.
- डिपॉझिटरी व गुंतवणूकदार यांच्यामधील दुवा म्हणून डी.पी. काम करते.
- हे थेट ग्राहकाशी व्यवहार करते हे वेळोवेळी खात्याचे विवरण पाठवते.
- प्रतिभूतीची बकँ म्हणून डी. पी. चे कार्य असते.
- हा डिमटेरियलायझेशन सुलभ करताे.
- हक्कभाग, बोनसभाग इत्यादी वाटपाच्या वेळी डी. पी. कडून प्रतिभूती डिमॅट खात्यात जमा केल्या जातात.
- दिलेला लाभांश, व्याज इत्यादी पटकन जमा करण्याचे काम डी. पी. कडून होते.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार पूर्तता डी. पी. करते.
- डी. पी. म्हणून खालील संस्था कार्य करतात.
- वित्तीय संस्था
- बँका
- मान्यताप्राप्त विदेशी बँका
- परिरक्षक (Custodian): म्युच्युअल फंडाच्या मालमत्तांचे व्यवहार पाहण्यासाठी जबाबदार संस्था.
- भागदलाल
- शोधन व्यवसाय संस्था (Clearing Corporation)
- बिगर बँकिंग वित्त पुरवठा संस्था (NBFC)
- भागविक्री निबंधक संस्था (Registrar to an issue)/भाग हस्तांतर नोंदणी संस्था (Share Transfer Agent)
- भागविक्री निबंधक संस्था (Registrar to an issue)/भाग हस्तांतर नोंदणी संस्था (Share Transfer Agent)
- प्रत्येक गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती डिमॅट खात्याची डी. पी. नोंद ठेवते.
- डी.पी ला अद्वितीय ओळख क्रमांक असतो.
