हिंदी

आकृती पूर्ण करा. पंतांच्या आहारनियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती पूर्ण करा.

सारिणी
Advertisements

उत्तर

पंतांच्या आहारनियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया

पंतांच्या पानात रोज चमत्कारिक पदार्थ पडू लागले.

एकदा नुसती पडवळे उकडून तिने पंतांना खायला दिली.

शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा या सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला.

कोबी, कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळाची स्वयंपाक घरातून हकालपट्टी झाली.

shaalaa.com
उपास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.1: उपास - कृती [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4.1 उपास
कृती | Q (१)(इ) | पृष्ठ १३

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___


कारणे शोधा.

बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ...........


‘उपास’ या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

भीष्म प्रतिज्ञा


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा.

बाळसेदार भाज्या


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

असामान्य मनोनिग्रह -


तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.


दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.


पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.


'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”

“हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

“बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी.

“मुख्य म्हणजे साखर सोडा.”

“मी सांगू का? मीठ सोडा.”

“लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.”

“तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका.

“दिवसा झोपणं सोडा.”

“खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.”

मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले.

२. आकलन कृती 

कोण ते लिहा.  (०२)

अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे 

आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. उपास हे कोणाचे खास कुरण होते?
  2. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला कोणी सुरुंग लावला?

“उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर तर वाढू दे वजन.” मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षयसंकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.

“लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!”

“इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!”

तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच!

दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

“हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.”

२. आकलन कृती

  1. खालील घटनेचा परिणाम लिहा. (०१)
    घटना: लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली.
    परिणाम: _____
  2. पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. (०१)
    बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×