हिंदी

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण ______.
  2. “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण ______.

         माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

         ‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर.

         ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’

         ‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

         पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले अनुभव कसे सांगितले ते सांग.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

१. 

  1. लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण त्यांनी आहारशास्त्राच्या पुस्तकात डोके घातले, परिणामतः प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये व इतर शब्दांवर त्यांची आस्था वाढली.
  2. “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण वजन कमी करण्यासाठी पदार्थांची यादी बटाट्यापासून सुरुवात कराला सांगितले.

२. 

३. लेखकाचे वजन वाढलेले होते, म्हणून त्यांनी दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करण्याचे ठरविले. त्यासाठी खाजगी-उपोषण सुरू केली तरी त्यांची चर्चा चाळीमध्ये सुरु झाली. कोण म्हणत नाही ती भानगड, हात दाखवून अवलक्षण, पेललं नाही म्हणून खाजगी झालं! असे अनेक टोमणे उपोषणाबाबत त्यांच्या कानांवर येऊ लागले. वजन कमी करण्यासाठी पुस्तकांमधून अभ्यास सुरू झाला. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये या शब्दांबद्दल कुतूहल निर्माण होऊन जेवताना कॅलरीजबाबत जागरूकता निर्माण झाली. या शास्त्रातील तज्ज्ञांनी बरेच सल्ले दिले. डाएटबाबत सुचविले, असे विविध अनुभव लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले दिसून येतात.

shaalaa.com
उपास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×