हिंदी

(१) उत्तरे लिहा: साधू ज्यांना हृदयी धरतात ते - ______ नवनीताप्रमाणे मऊ असणारे - ______ जें कां रंजलें गांजलें।त्यासि म्हणे जो आपुलें।।१।। तो चि साधु ओळखावा।देव तेथें चि जाणावा।।२।। मृदु सबाह्य नवनीत। - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:    (४)

(१) उत्तरे लिहा:

  1. साधू ज्यांना हृदयी धरतात ते -
  2. नवनीताप्रमाणे मऊ असणारे -

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें।।१।।

तो चि साधु ओळखावा।
देव तेथें चि जाणावा।।२।।

मृदु सबाह्य नवनीत।
तैसें सज्जनाचें चित्त।।३।।

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं।।४।।

दया करणें जें पुत्रासी।
ते चि दासा आणि दासी।।५।।

तुका म्हणे सांगू किती।
तो चि भगवंताची मूर्ती।।६।।

(२) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: 

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें।।
तो चि साधु ओळखावा।
देव तेथें चि जाणावा।।

आकलन
Advertisements

उत्तर

    1. साधू ज्यांना हृदयी धरतात ते - ज्यासि आपंगिता नाही/निराधार
    2. नवनीताप्रमाणे मऊ असणारे - सज्जनांचे चित्त
  1. जो व्यक्ती दुःखात सापडलेल्या आणि त्रासलेल्या लोकांवर प्रेम करतो, त्यांच्याशी आपुलकीने वागतो, माया-ममता दाखवतो, तोच खरा साधू मानला जातो. अशा दु:खी लोकांची सेवा करणाऱ्या साधूच्या व्यक्तिमत्त्वात देवपण असतं. खरेतर, अशा सेवाभावी साधूमध्येच देवाचे रूप दिसून येते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×