Important Questions [28]
- माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
- हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
- किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
- सूचनेप्रमाणे सोडवा: जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)
- आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी: या वाक्यातील उपमान ओळखा. ______
- 'फितूर होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:
- 'फितूर होणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
- परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
- सूचनेप्रमाणे सोडवा: पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)
- सूचनेप्रमाणे सोडवा. अशी माणसं क्वचितच सापडतात. (नकारार्थी वाक्य करा.)
- ‘पतिपत्नी’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
- 'पावलोपावली' या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
- नीलकंठ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
- योग्य पर्याय निवडा: ‘प्रतिक्षण’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
- ‘दशदिशा’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
- 'मी हलकेच उठतो' या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:
- कमलने बक्षीस मिळवले. या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.
- योग्य पर्याय निवडा व लिहा. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
- सूचनेनुसार सोडवा भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
- 'भावे प्रयोग' असलेले वाक्य शोधून लिहा: (१) त्यांना आपण जपलं पाहिजे. (२) मी डायनिंग टेबल जवळ येतो. (३) हा संदेश मला पोहोचवता आला. (४) तुम्ही गाडीतच बसा.
- योग्य पर्याय निवडा: ‘तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.
- खालील कृती करा. कर्णासारखा दानशूर कर्णच.वरील वाक्यातील- उपमेय ____________उपमान ____________
- योग्य पर्याय निवडा: दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालंमामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
- उपमान ओळखा: ‘सागरासारखा गंभीर सागरच।’ या वाक्यातील उपमान ओळखा.
- जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।। वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील। या वाक्यातील उपमेय ओळखा.
- निशिगंधासारखा निशिगंधच होय. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा:
- मुंगी उडाली आकाशीतिने गिळिले सूर्यासी ! वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
