मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा: सरस्वती महाल ग्रंथालय

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा:

सरस्वती महाल ग्रंथालय

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

  1. सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले.
  2. व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले.
  3. या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत.
  4. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.
shaalaa.com

उत्तर २

१. 'सरस्वती महाल ग्रंथालय' हे तमिळनाडूमधील तंजावर येथे असून इसवी सनाच्या सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळामध्ये बांधले गेले.

२. इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून तेथे स्वत:चे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

३. त्यानंतर व्यंकोजीराजे भोसले व त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाअधिक समृद्ध केले. सरफोजीराजे भोसले यांचा यात महत्त्वाचा सहभाग होता.

४. इसवी सन १९१८ मध्ये सरफोजीराजे यांच्या सन्मानार्थ या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

५. या ग्रंथालयामध्ये सुमारे ४९ हजार ग्रंथ संग्रहित केलेले आहेत.

shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब. ५.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q ३. (४) | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×