मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. संज्ञा कोश

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

संज्ञा कोश

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

  1. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की, त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात.
  2. वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये; म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात, त्यांना 'संज्ञा कोश' असे म्हणतात.
  3. संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते.
  4. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते.
shaalaa.com

उत्तर २

१. संज्ञा कोश हा कोशवाङ्मयाचा एक प्रकार आहे.

२. एखाद्या विषयातील संज्ञा वेगळ्या करून त्या समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. उदा. जागतिकीकरण, वसाहतवाद यांसारख्या संज्ञा स्पष्ट करताना या संज्ञा कोशांचा उपयोग होतो.

shaalaa.com
कोशवाङ्मय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब. ४.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×