मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. खेळणी आणि उत्सव. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

खेळणी आणि उत्सव. 

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे.

  1. विविध संस्कृतीत आणि धर्मांत उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते.
    सांताक्लॉज नाताळ मध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो.
  2. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.
  3. गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
  4. बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात.
shaalaa.com

उत्तर २

  1. लहान मुलांच्या करमणुकीकरता व शिक्षणाकरता जी रंगीबेरंगी विविध प्रकारची साधने व उपकरणे असतात, त्यांना खेळणी असे म्हणतात.
  2. काही खेळणी विशिष्ट उत्सवांच्या दरम्यान वापरली जातात.
  3. या खेळण्यांच्या अभ्यासातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा माहीत होतात.
  4. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे. मातीचे किल्ले तयार करून त्यावर शिवाजी महाराज व मावळ्यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. हा एक प्रकारचा खेळच आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळतो.
shaalaa.com
खेळांचे साहित्य आणि खेळणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.7: खेळ आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.7 खेळ आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब) १.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.7 खेळ आणि इतिहास
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×