Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो. मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिदा आहे, असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
