Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
आर्किमीडिजच्या जागी तुम्ही असता, तर त्या वेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते, त्याची कल्पना करा व लिहा.
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
आर्किमिडीज इतका हुशार मी नक्कीच नाही. मात्र, एखादे काम एकट्याने होत नसेल तर ते अनेकांच्या मदतीने करावे, हे मला माहीत आहे. दगड हलवणे हे एकट्या व्यक्तीच्या शक्तीबाहेरचे काम आहे, हे माझ्या लक्षात आले असते. जर मी आर्किमिडीजच्या जागी असतो, तर सर्व लोकांना एकत्र बोलावले असते. त्यांच्या एकजुटीच्या बळावर दगड हलवण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यात यश मिळवले असते. दगड हटवण्यासाठी आवश्यक असलेली साधनेही लोकांच्या मदतीने आणली असती व त्यांचा योग्य प्रकारे उपयोग केला असता. अशा रीतीने खड्ड्यातील दगड काढून टाकण्याचा निर्धार केला असता.
shaalaa.com
तरफ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?


