Advertisements
Advertisements
प्रश्न
‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
Advertisements
उत्तर
कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्यान खेळतात, यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे, हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घरसंसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करील, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री-पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील, हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल, दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री-पुरुषांची एकमेकांना साथ असेल, स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ______
(आ) ______
चौकट पूर्ण करा.
कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

२) उत्तरे लिहा. (२)
- मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
- कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______
|
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून ती मांडीवर घेते बाहुलीला बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून हळूहळू शिकेल तोही माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे |
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन
४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (२)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्यांच्या
मुलगा दाखवतो, तिला आपलं कसब पुन्हा एकदा
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
| ii. कसब - ______ |
