Advertisements
Advertisements
प्रश्न
सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही चार स्रोत स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- शुल्क (fees): कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते. उदा., शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी.
- सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती (Prices): आधुनिक शासन आपल्या नागरीकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदा., रेल्वे भाडे, टपाल सेवा इत्यादी.
- विशेष अधिभार: शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरीकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. उदा., ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, ऊर्जा, पाणीपुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात.
- दंड व दंडात्मक रकमा: देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे, हे आहे. उदा., वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
