Advertisements
Advertisements
प्रश्न
मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
प्रा. मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलानेभागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते.
मागणीची लवचिकता = `"मागणीतील शेकडा बदल"/"किमतीतील शेकडा बदल"`
Ed = `(%ΔQ)/(%ΔP)`
गणितीय पद्धतीने पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते.
Ed = `(ΔQ)/Q ÷ (ΔP)/P`
∴ Ed = `(ΔQ)/Q ÷ P/(ΔP)`
येथे, Q = मूळ मागणी
ΔQ = मागणीतील बदल
P = मूळ किंमत
ΔP = किंमतीतील बदल
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
