मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3 : 4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3 : 4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.

AB : BC = 3 : 4

जर AB = 3x सेमी

म्हणून, BC = 4x सेमी        ...(x हा सामाईक गुणक आहे.)

∴ CD = AB = 3x सेमी आणि AD = BC = 4x सेमी      ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा)

`square`ABCD ची परिमिती = 112 सेमी

∴ AB + BC + CD + AD = 112

∴ 3x + 4x + 3x + 4x = 112

∴ 14x = 112

∴ x = `112/14`

∴ x = 8

∴ CD = AB = 3x = 3 × 8 = 24 सेमी

∴ AD = BC = 4x = 4 × 8 = 32 सेमी

shaalaa.com
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 4. | पृष्ठ ७४

संबंधित प्रश्‍न

एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.


एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर 1 : 2 आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा.


खालील आकृती मध्ये `square`PQRS व `square`ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. ∠P = 110° तर `square`ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा.


खालील आकृती मध्ये `square`ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की BE = AB. तर सिद्ध करा, की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते.


खालील आकृती मध्ये, बिंदू G हा ΔDEF चा मध्यगा संपात आहे. किरण DG वर बिंदू H असा घ्या, की D-G-H आणि DG = GH, तर सिद्ध करा `square`GEHF समांतरभुज आहे.


खालील आकृती मध्ये `square`ABCD ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर P, Q, R, S बिंदू असे आहेत की, AP = BQ = CR = DS तर सिद्ध करा, की `square`PQRS हा समांतरभुज चौकोन आहे.


खालील आकृती मध्ये रेख AB || रेख PQ , रेख AB ≅ रेख PQ, रेख AC || रेख PR, रेख AC ≅ रेख PR तर सिद्ध करा की, रेख BC || रेख QR व रेख BC ≅ रेख QR.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×