Advertisements
Advertisements
प्रश्न
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______
पर्याय
तो रोज उपस्थित असतो.
तो सर्वांची काळजी घेतो.
तो चांगलं काम करतो.
तो सर्वांशी चांगले बोलतो.
Advertisements
उत्तर
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______
कारणे लिहा.
आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
स्वच्छता - ______
चौकटी पूर्ण करा.

‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) ओळखा पाहू. (२)
लेखकाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतून मुलांनी कोण बनावे असे म्हटले आहे ते ओळखून लिहा.
अ) तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेतील ग्रंथालयात दिसलं पाहिजे......
आ) तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे......
| खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न लोकांचं; पण आपल्या देशातील निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पाहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय, तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. |
२) तुलना करा. (२)
| आप्पांनी पाहिलेली मुलं | शिक्षकांनी पाहिलेली मुलं |
३) स्वमत- (३)
तुमच्या शालेय जीवनातील कोणतीही एक संस्मरणीय आठवण थोडक्यात लिहा.
