मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.  1. मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर ..... - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.  (२)

  • मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर .....
  1. मुले मध गोळा करायला शिकतील.
  2. मधमाशा मध कशा गोळा करतात हे समजेल.
  3. मुलांना कष्टांची किंमत आणि गंमतपण कळेल.
  4. मधमाशा दररोज किती मध गोळा करतात हे समजेल.
  • मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम.....
  1. काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचले.
  2. सगळेजण नळ दुरुस्त करायला शिकले.
  3. सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
  4. आता मुंबईत एकही नळ नादुरुस्त नाही.
मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.

२) पुढील कृतीतून दिसून येणारा गुण ओळखा.  (२)

अ) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले......

ब) काय ते लिहा.

पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे ...........

३) स्वमत-   (३)

'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे', आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

१)

  • मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर मुलांना कष्टांची किंमत आणि गंमतपण कळेल.
  • मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचले.

२) 

अ) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले- समाजसेवा, पैशांचा सदुपयोग.

ब) पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसणे.

३) पाणी हे बहुमोल आहे. पाणी हेच जीवन आहे. आपल्याला हे ठाऊक आहे; पण तरीही कळतनकळत आपण पाणी वाया घालवतो. एकीकडे पाण्याचा बेसुमार वापर होताना दिसतो, तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हांतील मैलोन्मैलांची वणवण असे विरोधाभास दर्शवणारे चित्र आहे. केवळ अज्ञानामुळे अनेक घरांतील गळक्या नळांमधून लाखो लिटर पाणी वाया जात असते. ही गोष्ट ओळखून मुंबईतला एक माणूस घरोघरी जाऊन ते गळणारे नळ तपासतो व दुरुस्त करतो. यामुळे, काही वर्षांतच वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचले आहे. त्यामुळे, पाण्यासाठी धडपडणाऱ्या कुणाला पाणी मिळाले आहे. त्यांचे दु:ख दूर झाले आहे. त्याचे हे कार्य कुणा दु:खी माणसाचे अश्रू पुसण्याइतकेच महत्त्वाचे आहे असे आप्पांना वाटते.

shaalaa.com
आप्पांचे पत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.1: आप्पांचे पत्र - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 10.1 आप्पांचे पत्र
कृती क्रमांक २ | Q 1. (अ)

संबंधित प्रश्‍न

कारणे लिहा.

पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______


कारणे लिहा.

आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______ 


शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______


आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.

आप्पांचे शिक्षणप्रेम - ______


चौकटी पूर्ण करा.


‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.


आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) ओळखा पाहू.  (२)

लेखकाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतून मुलांनी कोण बनावे असे म्हटले आहे ते ओळखून लिहा.

अ) तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेतील ग्रंथालयात दिसलं पाहिजे......

आ) तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे......

खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न लोकांचं; पण आपल्या देशातील निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पाहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय, तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा.

२) तुलना करा.  (२)

आप्पांनी पाहिलेली मुलं शिक्षकांनी पाहिलेली मुलं
   
   

३) स्वमत- (३)

तुमच्या शालेय जीवनातील कोणतीही एक संस्मरणीय आठवण थोडक्यात लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×