मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांचे राहणीमान उंचावणे, सुपोषण साधावे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारावे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

  1. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील लोक तसेच गरिबांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट होते. यानुसार, शासनाने लोकांच्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने अँलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार या पद्‌धतीना मान्यता दिली.
  2. आरोग्य क्षेत्रातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर येथे डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या खुली हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
  3. डॉ.प्रमोद सेठी यांनी लावलेल्या 'जयपूर फूट'च्या शोधामुळे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव बनवण्यास सुरुवात झाली.
  4. डॉ. जॉनी व डॉ. मोहन राव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले.
  5. १९७८ पासून ‘टेस्ट ट्यूब बेबी’ यामुळे अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. कोलकता येथे डॉ.सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला.
  6. पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. १९९५ मध्ये ‘पल्स पोलिओ’ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पोलिओ आटोक्यात आला.
shaalaa.com
बदलते जीवन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ५१

संबंधित प्रश्‍न

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

कुटुंबसंस्था


टीपा लिहा.

जयपूर फूट तंत्रज्ञान


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.


संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?


समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्‌दिष्ट आहे?


तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्‌द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.

  • घरांच्या रचनेत झालेला बदल
  • शेतीच्या संदर्भातील बदल
  • वाहनांची उपलब्धता

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×