Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे 50/60 शब्दांत उत्तर लिहा.
मुलाखतीचा समारोप कसा असावा?
पुढील प्रश्नाचे 60/65 शब्दांत उत्तर लिहा.
मुलाखतीचा समारोप कसा असावा?
Advertisements
उत्तर
मुलाखतीचा समारोप म्हणजे संपूर्ण संवादाचा कळसाध्याय असतो. शेवट प्रभावी आणि परिणामकारक असावा, जो श्रोते किंवा वाचकांच्या मनाला स्पर्श करणारा असेल. प्रश्न विचारण्याऐवजी समारोपात मुलाखतकाराने आपल्या भाषिक कौशल्याने मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे स्पष्टपणे मांडले पाहिजेत. मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी अशी वेळ, की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असतानाच संपावी; पण ‘ती अपूर्णच, अर्धवटच राहिली’ अशा स्थितीतही संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच; पण ‘अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते’, असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. हा समारोप असा हवा की तो श्रोत्यांच्या मनावर छाप सोडेल आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करेल. अशा प्रकारे समारोप मुलाखतीला अर्थपूर्ण आणि स्मरणीय बनवतो.
