Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन (१९९५) यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली.
जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही यांच्या मते, “स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे क्षमतांवर आधारित प्रारूप सुचविले आणि भावनिक बुद्धिमता म्हणजे त्यात पुढील चार बोधनिक क्षमता संचाचा समावेश होतो.
- भावनांची जाणीव होण्याची क्षमता: स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थविवरण करता येणे.
- भावना उपयोगात आणण्याची क्षमता: विचार करणे आणि समस्या सोडविणे या बोधानिक कार्याकरिता भावनांशी संबंधित माहिती उपयोगात आणता येणे
- भावना समजावून घेण्याची क्षमता: भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावनांमधील संबंधांचे आकलन करून घेता येणे.
- भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता: स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करता येणे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
