मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) आकृतिबंध पूर्ण करा. i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी- ii. मानव व वस्तू यांच्यातील समान भावना - मानव वस्तू

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-

  1. ____________
  2. ____________

२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना -  (2)

मानव  
वस्तू  
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही. 
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.

४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)

वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. 

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

१)

i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-

  1. जीव
  2. मन

२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना -

मानव सुखावणे
वस्तू सेवा करणे, स्वच्छतेची आवड

३) वस्तूंना स्वत:ची खोली नको असते; पण त्यांना त्यांच्या 'आपल्या मानलेल्या' म्हणजे त्यांच्या स्वत:च्या जागेवरून दूर न करण्याची हमी आपण देणे गरजेचे असते.

४) 'वस्तू' या कवितेतून कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणावे आणि त्यांच्याशी असलेले आपले भावनिक बंध व वस्तूंशी निगडित स्नेह जपावा असा विचार व्यक्त केला आहे.
आपण नेहम़ी वापरत असलेल्या वस्तू जर स्वच्छ असतील, तर आपल्याला त्यांचा अधिक चांगला वापर करता येतो. ती वस्तू दीर्घकाळ वापरणे शक्य होते. जेव्हा आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंची आपण दररोज स्वच्छता करतो, त्या टापटीप ठेवतो तेव्हा त्या स्वच्छ, लखलखणाऱ्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात. स्वच्छ वस्तू पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. जेव्हा आपण वस्तूंची योग्य ती काळजी घेतो तेव्हा आपल्या त्या वस्तूंविषयी असलेल्या भावनांमुळे त्या वस्तूंनाही समाधान मिळत असावे. वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही स्वच्छ राहण्याची आवड असते, असा नेहमीपेक्षा वेगळा आशय व्यक्त करणारा कवितेतील दृष्टिकोन मनाला भावतो.

shaalaa.com
वस्तू
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वस्तू - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 वस्तू
कृती क्रमांक १ | Q 2. (अ)

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______ 


कारणे लिहा.

वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______ 


कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.

वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.


‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.


तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

  1. वस्तूंना या गोष्टी नकोत- ______
  2. वस्तूना याची हमी हवी- ______

२) उत्तरे लिहा.  (२)

वस्तूंना असे ठेवावे.

  1. ____________
  2. ____________
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह

४) काव्यसाैंदर्य लिहा.   (२)

कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (2)

पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×