Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
विज्ञानाची कोणतीही तीन वैशिष्ट्ये.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
‘Science’(शास्त्र) सायन्स या इंग्रजी शब्दाची ‘Scientia’ (सायन्शिया) या लॅटीन शब्दापासून उत्पत्ती झाली आहे. ‘सायन्शिया’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो. ज्ञान संपादन करणे व ज्ञानाचे उपयोजन करणे आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पध्दतशीर कार्यप्रणालींच्या आधारे समजून घेणे, म्हणजे ‘शास्त्र’ होय.
शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः
- सप्रमाण पुरावा: शास्त्रात सप्रमाण पुराव्यांच्या आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला जातो. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवांतून केलेले माहितीचे संकलन, म्हणजे ‘सप्रमाण पुरावा’ होय. शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण पुराव्यांवर आधारित असते. दुसरा कोणताही संशोधक संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त ज्ञानाच्या सत्यतेची भविष्यात पडताळणी करून शकतो.
- वस्तुनिष्ठता: शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पध्दतीने अभ्यास करते. तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय. पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय.
- शास्त्रोक्त कार्यकारणभाव: परिवर्तकामधील कार्यकारणभाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो. शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकांवर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा (कारण) परतंत्र परिवर्तकावर (परिणाम) होणारा परिणाम अभ्यासतो.
- पद्धतशीर विश्लेषण: शास्त्रात एखाद्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी क्रमवार प्रक्रियेचा अवलंब केला जातो. क्रमवार प्रक्रियेत संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे, गृहीतक मांडणे, माहितीचे संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे, सार्वत्रिक नियम शोधणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो.
- पडताळा: दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचीती घेता येणे, म्हणजे ‘पडताळा’ होय. पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते.
- पूर्वकथन: शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाहीत, तर घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथनही करतात.
shaalaa.com
Notes
Students should write as many points as required by referring to the marks assigned to the question.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
