मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील 'औक्षण' कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८) मुद्दे: १. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१) २. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१) ३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळयांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळयांचे असें

तुला एकच औक्षण. 

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान

तुऱ्या शौर्यगाथे पुढे, त्याची केवढीशी शान;’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा- (०२)

१. द्रव्य २. शिर ३. रक्त ४. आसवं

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

१. कवयित्री - इंदिरा संत

२. कवितेचा विषय - सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाविषयी साऱ्या देशवासियांच्या मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावनांचे चित्रण.

३. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा अशी मनाशी इच्छा धरली तरी माझा जीव किती लहान आहे! क्षुद्र आहे! तुझ्या शौर्याच्या, पराक्रमांच्या महानतेपुढे माझ्या जिवाची तुलनाच होऊ शकत नाही.

४.

१. धन, पैसा, संपत्ती

२. डोके, मस्तक

३. रुधिर

४. अश्रू

५. कमीत कमी शब्दांत कवयित्री सैनिकांप्रतीच्या उत्कट भावना सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवते. युद्धभूमीवरील चित्र आपल्या डोळयांसमोर जिवंतपणे साकार करते. साधी, सोपी भाषा वापरल्यामुळे कवितेचे सहजपणे आकलन होते. सर्व देशवासियांची प्रतिनिधी बनून सैनिकाचे औक्षण करण्याची कवयित्रीची कल्पनादेखील सुंदर आहे. तसेच, डोळयांना निरांजनाची तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची दिलेली उपमा मनाला भावते. यमक, अनुप्रास अलंकारांचा सुयोग्य वापर केल्यामुळे कविता लगेच तोंडपाठ होते. या सर्व गोष्टींमुळे मला ही कविता खूपच आवडते.

shaalaa.com
औक्षण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: औक्षण - स्वाध्याय

संबंधित प्रश्‍न

‘‘औक्षण’ या कवितेसंबंधी खालील मुद्द्याांना अनुसरून कृती सोडवा.

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (०१ गुण)
  2. कवितेचा रचनाप्रकार - (०१ गुण)
  3. कवितेचा विषय - (०१ गुण)
  4. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) - (०१ गुण)
  5. कवितेतून व्यक्त होणारा विचार - (०२ गुण)
  6. कवितेतील आवडलेली ओळ - (०२ गुण)

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा.

कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?


खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?


खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?


योग्य पर्याय निवडा.

सैनिकाचे औक्षण केले जाते _________


योग्य पर्याय निवडा.

कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे _______


खालील ओळींचे रसग्रहण करा.

'अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.’


‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.


‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.


कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘औक्षण’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘तुझ्या शौर्यगाथे पुढे।
त्याची केवढीशी शान॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) औक्षण -
(ii) आसव -
(iii) तोफ -
(iv) दीन -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. डोळे भरून पहावी अशी - ______
  2. मुठीमध्ये नसलेले - ______

नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;

डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;

दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.

(2) एका वाक्यात उत्तरे लिहा. (2)

  1. कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
  2. सैनिकांचे पाऊल जिद्दीचे का वाटते?

(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. द्रव्य -
  2. आसवे -
  3. औक्षण -
  4. कल्लोळ -

(4) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा. (2)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×