Advertisements
Advertisements
प्रश्न
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
दिवाळीमध्ये रंगीत कागदी कंदिलांची सजावट मला खूप आवडते. पूर्वी आई नेहमीच बाजारातून लहान कंदील घेऊन यायची. पण यंदा मी ठरवलं की आपणच स्वतः कंदील तयार करायचा प्रयत्न करायचा. काय जमतंय का ते पाहूया, असा विचार केला. मी स्टेशनरीच्या दुकानातून रंगीत झिलेटीन, कागद आणि काड्या घेतल्या. सुताचं बंडलही आणलं. आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच कंदील बनवायला सुरुवात केली. चौकोनी चौकट तयार करताना काड्या जोडायला घेतल्या, पण अपेक्षेप्रमाणे काही जमलं नाही. दुपार झाली, मी पुन्हा पुन्हा चुकलेली चौकट उध्वस्त करून नव्याने जोडायला लागलो. काम व्यवस्थित जमेनासं झालं होतं. पण मी निश्चय केला होता की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचं नाही. हळूहळू काम जमायला लागलं. अखेर काड्यांची चौकट तयार झाली. त्यावर रंगीत कागद चिकटवणं तुलनेने सोपं गेलं. शेवटी खूप मेहनतीनंतर एक सुंदर कंदील तयार झाला. तेव्हा मला जाणवलं की ‘प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते.’
