मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
  2. उदा., प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात.
  3. क्लॉस्ट्रिडीअमसारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूंची चयापचय क्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात.
  4. प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
  5. चयापचयक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.
  6. एखाद्याने जर प्रतिजैविकांचे उपचार घेतले असतील तर त्यामुळे अन्न मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव हे अकार्यक्षम होतात, अशा उपयुक्त जीवाणूंना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात.
  7. अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात.
  8. तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या जसे कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्स वापरतात.
  9. या यांच्या फायद्यामुळे अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झाली आहेत.
shaalaa.com
प्रोबायोटिक्‍स (Probiotics)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 3. उ. | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×