मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मनाला आंदोलनाकरिता प्रेरित करण्यासाठी, कवींनी वीररसाच्या शब्दांचा उपयोग केला आहे. 'कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया' या दोन ओळींमध्ये शाहिरांनी मराठी मनाला समर्पण आणि धाडसाचे आवाहन केले आहे. त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. 'करी कंकण बांधून साचे', 'सत्यास्तव शिंग फुंकाया', 'पर्वत उलथून यत्नाचे', 'धर ध्वजा करी ऐक्याची', 'पाऊले टाक हिंमतीची', 'घे आण स्वातंत्र्याची' अशा अनेक ओळींमध्ये उत्साह आणि ओज निर्माण केला आहे. ही कविता मराठी मनाला जागृत करण्यासाठी वीररसाने भरलेली आहे.

shaalaa.com
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया - स्वाध्याय [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ ५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×