Advertisements
Advertisements
प्रश्न
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणातील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- बॉक्साइट ह्या धातुकाचे संहतीकरण: ॲल्युमिनिअमचे मुख्य धातुक बॉक्साइट आहे. बॉक्साइटमध्ये सिलिका (SiO2), फेरिक ऑक्साइड (Fe2O3) आणि टिटॅनिअम ऑक्साइड (TiO2) या अशुद्धी असतात. बेअरच्या पद्धतीने अथवा हॉलच्या पद्धतीने अपक्षालन करून या अशुद्धी वेगळ्या करण्यात येतात. या दोन्ही प्रक्रियांमध्ये शेवटी निस्तापन क्रियेने संहत ॲल्युमिना मिळवतात.
- ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण: या पद्धतीमध्ये ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे(द्रवणांक > 2000° C) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्रॅफाइटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन (ग्रॅफाइट) च्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रावणांक 1000° C पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट (Na3AlF6) आणि फ्ल्युअरस्पार (CaF2) मिसळले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
