मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

लस कशी तयार केली जाते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

लस कशी तयार केली जाते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. पूर्वीच्या काळी घोडे आणि माकडांच्या शरीरात रोगकारक जीवाणू टोचले जात. या प्रयोगशाळेतील हे प्राणी या रोगजंतूंच्या प्रतिबंधासाठी काही प्रथिने तयार करीत. त्यांना प्रतिपिंडे म्हणतात. हे पदार्थ त्या प्राण्यांच्या रक्‍तातून वेगळे करून त्यापासून लस बनवीत.
  2. जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या साहाय्याने रोगाची लस बनवता येते. यासाठी रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचे व्यापक संशोधन केले जात आहे. त्याच्या जनुकांची आणि डीएनएची रचना समजते. या माहितीच्या आधारे प्रथिने तयार केली जातात जी त्यास प्रतिबंध करू शकतात. या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार केली जाते.
  3. काही लसी जिवंत रोगजंतूंनीच बनवल्या जातात. हे रोगजंतू काहीसे निष्क्रिय आणि सुप्त करण्यात येतात. जेव्हा हे रोगजंतू लस म्हणून एखाद्या व्यक्तीच्या शरीरात टोचल्यास ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात. जेव्हा त्याच व्यक्तीला या आजाराची लागण होते तेव्हा त्याच्या शरीरात आधीच प्रतिकारशक्ती निर्माण करणारी रसायने तयार असतात.
shaalaa.com
प्रतिजैविके
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [पृष्ठ ९५]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 7. आ. | पृष्ठ ९५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×