Advertisements
Advertisements
प्रश्न
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान!
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
सैनिकाच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणीही गायक डफ घेऊन जाहीररीत्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की, या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
