मराठी

खालील विषयावर पत्र लिहा. तुम्ही देवा/देविका मानेकर संत गजानन नगर, अकोला 443403. असून तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर पत्र लिहा.

तुम्ही देवा/देविका मानेकर संत गजानन नगर, अकोला 443403. असून तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. यासंबंधी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

देविका मानेकर
संत गजानन नगर,
अकोला – 443403
दिनांक: ८ नोव्हेंबर २०२५

प्रति,
आरोग्य अधिकारी,
महापालिका कार्यालय,
अकोला

    विषय: अशुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत तक्रार...

महोदय,

माझ्या भागात, संत गजानन नगर येथे, गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पाण्यात चिखल आणि दुर्गंधी आढळून येते. त्यामुळे आजारांची शक्यता वाढली आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना याचा विशेष त्रास होत आहे.

आपण त्वरित योग्य तपासणी करून स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,
देविका मानेकर

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×