Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे ते सकारण स्पष्ट करा.
भ्रमणध्वनी व्यसन हे फक्त तरुणांमध्ये आढळते.
चूक किंवा बरोबर
Advertisements
उत्तर
हे विधान असत्य आहे.
कारणे:
- सर्वव्यापी समस्या: आजच्या काळात भ्रमणध्वनी (Mobile) हे केवळ तरुणांच्याच हातात नसून, ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींकडे उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचे व्यसनही सर्व वयोगटांत दिसून येते.
- विविध उपयोग: प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वेगवेगळ्या कारणांसाठी भ्रमणध्वनीचा वापर करते. उदा. लहान मुले गेमिंगसाठी, तरुण सोशल मीडियासाठी, तर वृद्ध बातम्या किंवा मनोरंजनासाठी याचा वापर करतात. या अतिवापरामुळे कोणालाही याचे व्यसन जडू शकते.
- पँडोराज बॉक्स (Pandora’s box): भ्रमणध्वनीमध्ये संपर्क (Connectivity), बँकिंग, शॉपिंग, चित्रीकरण आणि संपादन यांसारख्या असंख्य सोयी उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे लोक या उपकरणाच्या आहारी जातात, जो केवळ तरुणांपुरता मर्यादित विषय नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
