मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संक्षिप्त टिप लिहा: संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संक्षिप्त टिप लिहा:

संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.

पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:

संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

  1. मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या संदेशवहन साधनांचा वापर करतो. उदाहरणार्थ, चित्रे, चिन्हे, संकेत, शरीरभाषा, हालचाली इत्यादींच्या माध्यमातून संवाद साधला जातो.
  2. पूर्वीच्या काळात आदिवासी लोक संदेशवहनासाठी रंगीत धुराचा वापर करत असत. मात्र, आजच्या काळात आपण टेलिफोन, मोबाईल, आंतरजाल इत्यादी आधुनिक साधनांचा वापर करतो.
  3. संदेशवहन उपग्रह हा एक कृत्रिम उपग्रह आहे जो रेडिओ दूरसंचार संकेत प्रसारित आणि वाढवतो.
  4. संदेशवहन उपग्रहांचा उपयोग दूरदर्शन, दुरध्वनी, रेडिओ, आंतरजाल आणि लष्करी वापरासाठी केला जातो. उपग्रह संदेशवहनाद्वारे भौतिक आणि मानवी घटकांची माहिती मिळते. दुर्गम बेटे, काही देश, आणि खंड जिथे भूपृष्ठीय दूरसंचार सेवा अपुरी किंवा अनुपलब्ध असते, तिथे संदेशवहन उपग्रह मोठी भूमिका बजावते.
  5. दूरदर्शन हा संदेशवहनाचा मुख्य भाग बनत असल्याने, उपग्रह दूरसंचारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, आंतरजाल आणि लष्करी दूरसंचारसाठी देखील उपग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, उपग्रह हे एक महत्त्वाचे संदेशवहन साधन बनले आहे.
shaalaa.com

उत्तर २

  1. संदेशवहन उपग्रह हा एक कृत्रिम उपग्रह आहे, जो ट्रान्स्पोन्डर द्वारे, रेडिओ, टेलि कम्युनिकेशन सिग्नलशी संबंधित आणि विस्तारित करतो.
  2. टेलिव्हिजन, टेकिफोन, रेडिओ, इंटरनेट आणि सैन्य दलांवळणासाठी उपग्रहांचा वापर केला जातो.
  3. उपग्रहांच्या मदतीने भौगोलिक आणि मानवी घटकांची माहिती मिळते. काही देश आणि खंडांमध्ये दुर्गम बेटांवर उपग्रहांची मदत घेतली जाते.
  4. लैंडलाइन कम्युनिकेशन दुर्मिळ झाल्या कारणांमुळे किंवा उपलब्ध नसल्या कारणाने संदेशवहनासाठी संदेशवहन उपग्रहाचे महत्त्व वाढले आहे.
  5. टेलिव्हिजन हे मुख्य बाजारपेठ बंद असल्या कारणाने उपग्रहाची मागणी काळाची गरज बनली आहे.
  6. उपग्रहा सैन्य दळणवळण तसेच इंटरनेट इत्यादीसाठी वापरले जाते अशा प्रकारे संदेशवहन उपग्रहाचे महत्त्व वाढले आहे.
shaalaa.com

उत्तर ३

  1. प्राचीन काळापासून मानवाने माहितीच्या देवाणघेवाणीसाठी चित्रे, मुद्रा आणि भाषेचा आधार घेतला आहे. ही माहिती पोहोचवण्यासाठी मानवाने वेळोवेळी विविध दूतांची किंवा संदेशवाहकांची मदत देखील घेतली आहे.
  2. आधुनिक काळात कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांची अचूक माहिती देतात. हवामानाची स्थिती, नैसर्गिक आपत्तींचे (चक्रीवादळ, भूकंप) संकेत, खनिजांचा शोध आणि भौगोलिक स्थान निश्चित करणे ही कामे उपग्रहांमुळे सुलभ झाली आहेत.
  3. आजच्या युगात उपग्रहांमुळे इंटरनेट, मोबाईल आणि दूरध्वनीद्वारे लेखी माहिती, आवाज आणि व्हिडिओ अत्यंत वेगाने पाठवता येतात. उपग्रहांच्या तंत्रज्ञानाने जगातील अंतराची मर्यादा संपवून टाकली असून, कोणत्याही कोपऱ्यात एकाच वेळी लाखो लोकांशी त्वरित संवाद साधणे आता सहज शक्य झाले आहे.
shaalaa.com
संदेशवहन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ४. १) | पृष्ठ ६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×