मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सभोवतालचे तापमान आणि ध्वनीचा स्रोत व परावर्ततशील पृष्ठभाग यांमधील अंतर हे दोन घटक प्रतिध्वनीच्या निर्मितीत महत्त्वाचे असतात.
  2. 22°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर/सेकंद असतो. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल.
  3. अंतर = वेग × काल
    = 344 मीटर/सेकंद × 0.1 सेकंद
    = 34.4 मीटर
    अशाप्रकारे, ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर व पुन्हा स्त्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनीने किमान 34.4 मीटर अंतर पार करणे आवश्यक आहे.
  4. त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर असावे लागते.
  5. वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात.
shaalaa.com
प्रतिध्वनी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 12 ध्वनीचा अभ्यास
स्वाध्याय | Q 3. अ. 2. | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×