Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Advertisements
उत्तर
- कवी - मोरोपंत
- सज्जनांच्या सहवासाचे, सद्विचारांच्या श्रवणाचे व सत्कर्माचे महत्त्व पटवून देणे हा या कवितेचा विषय आहे.
- मोरोपंतांची ही काव्यरचना सज्जन माणसांच्या सहवासाचे आणि चांगल्या विचारांचे महत्त्व सहजपणे पटवून देते. कवितेत ओघवती, रसपूर्ण आणि सोपी भाषा वापरल्यामुळे ही कविता श्लोकांसारखी सहज गाता येते. ‘भरतवाक्य’ म्हणजे नाटकाचा शेवटचा संवाद, आणि याच संदर्भाने ‘केकावली’तील शेवटची पद्यरचना म्हणून मोरोपंतांनी या रचनेला ‘भरतवाक्य’ असे समर्पक नाव दिले असावे. या रचनेत मोरोपंतांनी संस्कृतप्रचुर शब्द आणि अलंकारांचा सुंदर वापर केला आहे. ‘सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो’ ही ओळ ‘सुभाषित’ म्हणून प्रसिद्ध आहे. मोरोपंतांनी स्वत:ला मोर मानून, ईश्वराला केलेल्या स्मरणाला ‘केकावली’ हे नाव दिले गेले हा संदर्भही विशेष मनोरंजक वाटतो. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______
सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
| गोष्टी | विनंती |
| (१) निश्चय | ______ |
| (२) चित्त | ______ |
| (३) दुरभिमान | ______ |
| (४) मन | ______ |
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मति सदुक्तमार्गीं वळो
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
न निश्चय कधीं ढळो
‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. सुसंगतीचे महत्त्व
- ___________
- __________
2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।
