मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा आपण विग्रह व समासाचे नाव असा अभ्यास करावा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा आपण विग्रह व समासाचे नाव असा अभ्यास करावा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
नीलकमल    
महाराष्ट्र    
भाषांतर    
पांढराशुभ्र    
घननीळ    
शामसुंदर    
कमलनयन    
नरसिंह    
विद्याधन    
रक्तचंदन    
घनश्याम    
काव्यामृत    
पुरुषोत्तम    
महादेव    
तक्ता
Advertisements

उत्तर

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
नीलकमल नील असे कमल कर्मधारय समास
महाराष्ट्र महान असे राष्ट्र कर्मधारय समास
भाषांतर अन्य भाषा कर्मधारय समास
पांढराशुभ्र शुभ्र असा पांढरा कर्मधारय समास
घननीळ निळा असा घन कर्मधारय समास
शामसुंदर सुंदर असा श्याम कर्मधारय समास
कमलनयन कमळासारखे नयन कर्मधारय समास
नरसिंह सिंहासारखा नर कर्मधारय समास
विद्याधन विद्या हेच धन कर्मधारय समास
रक्तचंदन रक्तासारखे चंदन कर्मधारय समास
घनश्याम घनासारखा श्याम कर्मधारय समास
काव्यामृत काव्यरूपी अमृत कर्मधारय समास
पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष कर्मधारय समास
महादेव महान असा देव कर्मधारय समास
shaalaa.com
समास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 1.1

संबंधित प्रश्‍न

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
जलदुर्ग- ____________.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. समासाचा विग्रह

सामासिक शब्द

(१)

राजाची आज्ञा

____________

(२)

आठ अंगांचा समूह

____________

(३)

उत्तम असा पुरुष

____________


पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.

(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

अन्य असा वेश

(२)

दुष्काळ

____________

(३)

____________

मान हेच धन

(४)

____________

निळा सावळा असा


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

घनश्याम - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

अष्टाध्यायी - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

द्‌विदल - ______


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

त्रैलोक्य - ______ 


खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो - ______ 


खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
१) इतरेतर द्वंद्व समास
बहिणभाऊ    
आईवडील    
नाकडोळे    
सुंठसाखर    
कृष्णार्जुन    
विटीदांडू    
कुलूपकिल्ली    
स्त्रीपुरुष    
२) वैकल्पिक द्वंद्व समास
बरेवाईट    
सत्यासत्य    
चारपाच    
तीनचार    
खरेखोटे    
३) समाहार द्वंद्व समास
अंथरूण पांघरूण    
भाजीपाला    
कपडालत्ता    
अन्नपाणी    
पालापाचोळा    
केरकचरा    

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
आईवडील    
नवरात्र    

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
काव्यामृत अ. इतरेतर द्वंद्व समास
पंचारती ब. कर्मधारय समास
  इ. द्विगू समास

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला द्विगू समास
(ii) कमलनयन समाहार द्वंद्व समास
  कर्मधारय समास

‘पतिपत्नी’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.


‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×