Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
Advertisements
उत्तर
कवी ज. वि. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. रूढ धार्मिक, सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या, नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या कर्तृत्ववान नायकाला या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.
चवदार तळ्याची घटना घडून पन्नास वर्षे झाली आहेत. आजही तरुणपिढीला डॉ. आंबेडकरांसारख्या खंबीर नेतृत्वाचा ध्यास आहे. त्यांनी पुन्हा यावं आणि हे रण पुन्हा पेटून उठावे अशी आस या पिढीच्या मनात आहे. ही पिढी मानवतेच्या या लढ्यासाठी सज्ज आहे. त्यांची साक्ष देणारे बिगूल आजही त्यांच्यासारख्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्यावेळी तापलेली जनता आता थंड झाली आहे. या चळवळीला आंबेडकरांसारख्या महामानवाच्या आधाराची गरज आहे. ती चळवळ आता थंडावली आहे; मात्र युद्धसज्ज होऊन आपल्या नायकाची प्रतीक्षा करत आहे, असा अर्थ वरील पद्यपंक्तींतून व्यक्त होत आहे.
प्रस्तुत ओळींतून वाचकाला वीररसाचा प्रत्यय येतो. सूर्यफुले, बिगूल अशा प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक वेगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची महानता स्पष्ट होते.
या समाजप्रबोधनपर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. त्यामुळे, कवीचे मनोगत थेट रसिक वाचकापर्यंत पोहोचते. कवीने संवादपर शैलीचा वापर केल्यामुळे जणू काही कवी डॉ. आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवादशैलीमुळे कवितेच्या साैंदर्यात भर घातली गेली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.
कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
| कवितेतील संदर्भ | स्पष्टीकरण |
| (१) मळवाट | (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज |
| (२) खाचखळगे | (आ) पारंपरिक वाट |
| (३) मूक समाज | (इ) अडचणी, कठीण परिस्थिती |
चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
| पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती | पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती |
| ____________ | ____________ |
| ____________ | ____________ |
| ____________ | ____________ |
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
1. असत्य विधान ओळखा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
- पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
- चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.
2. खालील आकृती पूर्ण करा. (२)

पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
