मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

का ते लिहा. श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

का ते लिहा.

श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.

सविस्तर उत्तर
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर १

श्यामच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांना नवीन कपडे वर्षा-दोन वर्षांनी मिळत असत. कपडे फाटले, तर गाबड्या (ठिगळ) जोडून वापरावे लागत. अशातच श्यामच्या लहान भावाने आईजवळ नवीन कपड्यांसाठी हट्ट धरला. त्यावेळी “तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील.” असे सांगून आईने त्याची समजूत घातली. हे ऐकून श्यामने आपल्या लहान भावाचा हट्ट पुरवण्याचा निश्चय केला. वडील श्यामला वरचेवर जे खाऊसाठी पैसे देत ते त्याने खाऊसाठी खर्च न करता साठवण्यास सुरुवात केली. एक रुपया जमा केला. त्यात दोन वार कापड व अर्धा वार अस्तर विकत घेतले. शिंप्याकडून भावाच्या मापाचा एक छानसा कोट शिवून घेतला.

भावावरील प्रेमापोटी श्यामने सारे प्रयत्न केले होते. लहान भावाची इच्छा पूर्ण करू शकल्यामुळे, जेव्हा श्यामने तयार झालेला तो कोट हातात घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

shaalaa.com

उत्तर २

श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अधूंनी न्हाले होते.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: श्यामचे बंधुप्रेम - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ २७
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×