मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.

खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा:

जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर १

  1. अमानतुल्ला खान यांनी १९६५ साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये Plebiscite Front हा लष्करी गट स्थापन केला. १९७७ साली त्याचे नामकरण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (Jammu-Kashmir Liberation Front) असे करण्यात आले.
  2. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास साहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजाबूल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवादयांना भारतात पाठवले. त्यातून आझादीचा लढा हा Pan- Islamic लढा बनला.
  3. पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असन राजकीय अस्थेर्य निर्माण झाले आहे.
  4. भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे.
shaalaa.com

उत्तर २

  1. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार (Indian Independence Act, 1947) संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता.
  2. १९७७ मध्ये या Plebiscite Front ला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (Jammu-Kashmir Liberation Front) असे नवीन नाव देण्यात आले. १९८९ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आणि JKLF नेतत्कालीन गृहमंत्र्यांच्या कन्या रुबिया सैद यांचे अपहरण केले. जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी ही JKLF ची प्रमुख मागणी होती.
  3. काश्मीरमधील पाकिस्‍तानवादी गनिमी गटांना मदत करण्यासाठी पाकिस्‍तानने हिज्‍बूल मुजाहिद्दींना तेथे पाठवण्याचा निर्णय घेतला.
  4. वाढलेल्या इस्लामी आक्रमतेमुळे १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला त्यामुळे काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले.
  5. भारत-पाक संबंधांमध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच सर्वांत महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.
shaalaa.com
जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ६ (२) | पृष्ठ ४७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×