Advertisements
Advertisements
प्रश्न
जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलमात्मक लेखन करा.
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
- जैवतंत्रज्ञानाने मानवजातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले. त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त म्हणता येते. आरोग्य आणि औदयोगिक उत्पादनांचे अनेक प्रश्न सहज सोडवले आहेत. पूर्वीच्या काळी अकस्मात रोगराईच्या साथी पसरत. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडत. अन्नाचा तुटवडा तर नेहमीच असे. दुष्काळ आणि त्यामुळे होणारी उपासमार यांत मानवजात होरपळून निघत होती. साधारण चाळीस-पन्नास वर्षापूर्वी दुधाची उपलब्धता फार कमी होती. धान्योत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता.
- पण जैवतंत्रज्ञानाच्या उदयानंतर धान्य आणि इतर अन्न यांबाबत आपण खूप प्रगती केली आहे. आरोग्याचे अनेक प्रश्न आता सोपे झाले आहेत. मधुमेहासारख्या रोगांसाठी आता मानवी इन्सुलिनच्या साहाय्याने शर्करा-नियंत्रण करणे सोपे झाले आहे.
- विविध लसी तयार झाल्यामुळे रोगांच्या साथीवर नियंत्रण आलेले आहे.
- प्रदूषण-नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनाचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येत आहेत.
- हे असे छान चित्र असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात. जीवाणू-विषाणूच्या जिनोममध्ये मानवी जनुके घालून ईप्सित साधले जाते.
- क्लोनिंगसारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे. मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्यांना माता असेल पण पित्याची जरूरी लागणार नाही. कृत्रिमतेने पृथ्वीवरच्या सजीवांच्या जनुकांचे मानवाने त्याच्या फायदयासाठी फेरबदल केले तर निसर्ग-नियमात हे बसणारे नाही. त्याचे दूरगामी परिणाम भयानक असतील, त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानिकारक देखील होऊ शकते.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.
जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?
खालील तक्ता पूर्ण करा.

गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.
प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.
व्याख्या लिहा.
जैवतंत्रज्ञान
टीप लिहा.
जनुकीय अभियांत्रिकी
जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.
जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.
जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?
