मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

घटत्‍या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके खालीलप्रमाणे आहेत:

  1. विवेकशीलता: उपभोक्‍ता विवेकशील आहे आणि त्‍याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. त्‍यामुळे तो महत्‍तम समाधान मिळविण्याचा प्रयत्‍न करतो.
  2. संख्यात्‍मक मापन: सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्‍मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते. त्‍यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्‍य होतात. यामुळे वस्‍तूच्या प्रत्‍येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्‍यांची तुलना करता येते.
  3. एकजिनसीपणा: उपभोगातील वस्‍तूचे सर्व नग आकार, स्‍वरूप, रंग, चव इत्‍यादींबाबत समान आहेत.
  4. उपभोग सातत्‍य: एखाद्या वस्‍तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो.
  5. योग्‍य आकारमान: उपभोग्‍य वस्‍तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्‍य किंवा साधारण असावे. ते अत्‍यंत मोठे किंवा लहान नसावे.
  6. स्‍थिरता: उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्‍त्‍याचे उत्‍पन्न, चव-पसंती, सवयी, आवडी-निवडी यांसारखे घटक स्‍थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगिता सुध्दा स्‍थिर असल्‍याचे गृहीत धरले जाते.
  7. विभाज्‍यता: सिद्धांत असे गृहीत धरतो की, उपभोगात आणलेली वस्‍तू विभाज्‍य असावी. त्‍यामुळे वस्‍तूचे लहान भागात विभाजन करता येईल.
  8. एकच गरज: एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्‍तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहित धरतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×