मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) काढा. (संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो.)

बेरीज
Advertisements

उत्तर

मलिक गॅस एजन्सी:

आऊटपुट टॅक्स = 26,500 चे 5%

`= 5/100 xx 26,500` = ₹ 1,325

इनपुट टॅक्स = 24,500 चे 5%

`= 5/100 xx 24500` = ₹ 1,225

∴ इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) = ₹ 1,225

∴ देय कर = आऊटपुट टॅक्स - इनपुट टॅक्स क्रेडिट

= 1,325 - 1,225 = ₹ 100

CGST = UTGST = `"देय जीएसटी"/2 = 100/2`

∴ CGST = UTGST = ₹ 50

∴ 5% दराने एकूण देय जीएसटी ₹ 100 आहे. केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) प्रत्येकी ₹ 50 आहे.

shaalaa.com
व्यवसाय साखळीतील जी.एस.टी.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: अर्थनियोजन - सरावसंच 4.2 [पृष्ठ ९३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 अर्थनियोजन
सरावसंच 4.2 | Q 4 | पृष्ठ ९३

संबंधित प्रश्‍न

चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.


अमीर एंटरप्राइझने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर (CGST) व राज्याचा देय कर (SGST) काढा.


खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा.

नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.

पुरवठादार: मे ______ पत्ता ______ राज्य ______ तारीख ______ इनव्हॉइस क्रमांक ______ GSTIN ______

वस्तूचा तपशील:

मोबाइल बॅटरीचा दर ₹ 200 1 नग GST चा दर 12 % HSN 8507
हेडफोनचा दर ₹ 750 1 नग GST चा दर 18 % HSN 8518

जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.


GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.


जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.


एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?


एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले, तर 18% दराने

  1. ठोक व किरकोळ विक्रीच्या करबीजकांतील करांची आकारणी करा.
  2. ठोक व्यापाऱ्याचा, तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा

अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लिनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लिनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला, तर या व्यवहारातील खालील किमती काढा.

  1. अण्णा पाटलांनी बनवलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?
  2. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?
  3. वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करावयाचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.

खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक I, II, III मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे.

  1. उत्पादकाने, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने (रिटेलरने) शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे विवरणपत्रक तयार करा.
  2. अंतत: ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल?
  3. या साखळीतील B2B व B2C बीजके कोणती ते लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×