मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?

बेरीज
Advertisements

उत्तर

ड्रेसची छापील किंमत = ₹ 1,000

छापील किमतीवरील सूट = 5 %

∴ ड्रेसवरील सुटीची रक्कम = छापील किमतीच्या 5 %

`= 5/100 xx 1,000` = ₹ 50

∴ ड्रेसची करपात्र किंमत = छापील किंमत – सूट

= 1,000 - 50 = ₹ 950

GST चा दर = 5%

GST = करपात्र किमतीच्या 5%

`= 5/100 xx 950` = ₹ 47.5

∴ ड्रेसची खरेदी किंमत = करपात्र किंमत + GST

= 950 + 47.5 = ₹ 997.50

∴ ग्राहकाला तो ड्रेस ₹ 997.50 ला पडेल.

shaalaa.com
व्यवसाय साखळीतील जी.एस.टी.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A [पृष्ठ ११०]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A | Q 3 | पृष्ठ ११०

संबंधित प्रश्‍न

नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.


मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.


खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे (B2B) टॅक्स इनव्हॉइस तयार करा.

नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.

पुरवठादार - नाव, पत्ता, राज्य, GSTIN, बिल क्रमांक व तारीख.

प्राप्तकर्ता - नाव, पत्ता, राज्य GSTIN

वस्तूंचा तपशील:

(१) पेन्सिल बॉक्स 100, HSN 3924, दर ₹ 20, GST 12%

(२) जिग सॉ पझल्स 50, HSN 9503, दर ₹ 100, GST 12%


जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.


स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18 % आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर ______ आकारण्यात येतो.


GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.


जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.


सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?


श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट (ITC) व किती रुपये कर भरावा लागेल?


Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×