Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
डॉ. यू. म. पठाण यांच्या भाषेचे सर्वांत पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी, सरळ, भाषा स्वतःचा अनुभव ते पारदर्शीपणे व्यक्त करतात. उत्तररात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहूल लागू न देणारे' असे असते. पावलाचा हळुवारपणा, नाजुकपणा, मुलायम पण त्या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदा., उत्तररात्र प्रवेश करते, त्याचे वर्णन करणारे वाक्य पाहा - 'उत्तररात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं येथे पाऊल 'पडत' नाही किंवा 'टाकले जात नाही. उत्तररात्र 'हलकेच पाऊल ठेवते' अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय येतो. वाचकाला ती भाषा भावते. हे एक उदाहरण झाले. पण संपूर्ण पाठभर अशी अनुभवाचा प्रत्यय देणारी भाषा आढळते.
लेखकांना सृष्टीतले मानवेतर घटक कोरडे, भावनाविरहित वाटतच नाहीत. ते त्यांना माणसांप्रमाणेच भावभावनांनी भिजलेले, सजीव, चैतन्यपर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे 'हळूहळू डोळे किलकिले' करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना 'खुणावतात '. पाखरे 'कुजबुजली'. बोगनवेल 'सळसळू' लागते. दोन्ही वाफे 'एकमेकांशी हितगुज' करतात. मोगरा 'खुदखुद हसतो'. तो कधी रुसून बसतो'. झाडे-वेली 'भावुक होतात' अशा रितीने सर्व घटक मानवी रूप घेऊन येतात. लेखन हृद्य बनते. लेखनातला अनुभव भावभावनांशी रसरशीत बनतो.
उत्तररात्री आगमन, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात.
आणखी एक वैशिष्ट्य बघा. असं कोणतं बरं नातं', 'का बरं म्हटलं असावं' ही शब्दरूपे पाहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाहीत. ही दैनंदिन जीवनातली बोलण्यातली शब्दरूपे आहेत. एखादा माणूस आपल्या जिवलग मित्राशी जिवाभावाच्या गप्पागोष्टी करीत बसला असावा, तसे हा लेख वाचताना वाटत राहते. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाल्याचे दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
कृती करा.
घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन
कारणे शोधा व लिहा.
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...
कारणे शोधा व लिहा.
मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
सायली -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
गुलमोहोर -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
जॅक्रांडा -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
चाफा -
वर्णन करा.
उत्तररात्रीचे आगमन
वर्णन करा.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वृक्ष-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
फुले-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वेली-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
पाखरे-
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ______
(र) ______
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) ______
(र) ______
|
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’ पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. |
(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.
