मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा. नायट्रोजन चक्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

नायट्रोजन चक्र

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते.

नायट्रोजन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया:

  1. नायट्रोजनचा स्त्रोत: हवेतील रेण्वीय स्वरूपातील नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही. वनस्पती जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनचे क्षार वापरतात. म्हणजे वनस्पतींसाठी जमिनीतील क्षार स्वरूपातील नायट्रोजन हा नायट्रोजनचा मुख्य आणि एकमेव स्त्रोत आहे.
  2. नायट्रोजनचे स्थिरीकरण: हवेतील रेण्वीय नायट्रोजनचे त्यांच्या क्षारांच्या स्वरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे.
  3. अमोनीकरण: सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे.
  4. नायट्रीकरण: अमोनिआचे नाइट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे.
  5. विनायट्रीकरण: नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे. 
    नायट्राेजन चक्र
shaalaa.com
नायट्राेजन चक्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×