मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा. ऑक्सिजन चक्र - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

ऑक्सिजन चक्र

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय.

ऑक्सिजन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया:

  1. वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती आणि वापर सतत होत असतो. ऑक्सिजन चक्रात जैविक व अजैविक अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो.
  2. प्रकाशसंश्लेषणादरम्यान (जैविक क्रिया) वनस्पती कार्बन डायऑक्साइइडचा वापर करतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्‍त करतात. वातावरणातील या ऑक्सिजनचा वापर प्राणी श्वसनासाठी करतात आणि कार्बन डायऑक्साइड वातावरणात मुक्‍त करतात.
  3. मुक्‍त झालेल्या कार्बन डायऑक्साइडचा पुनर्वापर वनस्पती प्रकाशसंश्लेषणासाठी करतात.
  4. प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो.
  5. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो.
  6. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. रेण्वीय ऑक्सिजन (O2), पाणी (H2O), कार्बन डायऑक्साईड (CO2) व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.

                                  ऑक्सिजन चक्र
shaalaa.com
ऑक्सिजन चक्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 4. इ. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×